वेंगुर्ला :
मौजे रेडी गावतळे येथील महाराष्ट्र गोवा हद्दी वरील चेक पोस्ट परिसरात काल वन्य प्राणी मगर आढळून आले. त्याबाबत ड्युटीवरील पोलीस नाईक श्री किरण पिळगांवकर, यांनी वनविभागास कळविले नुसार तात्काळ दखल घेऊन वनविभाग अधिकारी जागेवर रात्रौ 1.30 ते 2.00 च्या दरम्यान हजर झाले. त्यावेळी जात स्थानिक ग्रामस्थ व चेक नाका पोलीस अधिकारी यांचे मदतीने 6 ते 7 फूट लांब अंदाजे 5 ते 6 वर्ष वयाच्या वन्यप्राणी मगरीस ताब्यात घेत. तिला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी कुडाळ श्री शिंदे म्हणाले “मगर हा मांसभक्षक सरपटणारे प्राणी असून त्यास वन्यजीव सरंक्षण अधिनियम 1972 अन्वये संरक्षित केले असूनअनुसूची 1 मध्ये वर्गीकृत केले आहे. जलीय पर्यावरण संस्थेमध्ये मगर हा सर्वोच्च भक्षक किंवा शिकारी प्राणी आहे आणि त्याच्या असण्याने ही जलीय पर्यावरण संस्था सुस्वरूप आणि आरोग्यदायी राहते.”
साधारण जानेवारी ते जून हा मगरीचा विणीचा हंगाम असतो आणि या दरम्यान जोडीदार शोधणे, मिलन, अंडी घालने आणि ती अंडी जमिनीत/कुजनाऱ्या पाळा पाचोळ्यात नैसर्गिक रित्या ऊबवून पिल्ली निघेपर्यंत नर आणि मादी दोघे मिळून त्याच्या पिल्लांची काळजी घेतात.
मगरींना वाचवणे आवश्यक आहे कारण उष्णकटिबंधीय अन्नसाखळीमध्ये मगरी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. ज्याप्रमाणे ज्या जंगलात वाघ आहे तिथली अन्नसाखळी सुस्थितीत असते, त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी मगर आहे त्या ठिकाणची पाण्यातली अन्नसाखळी देखील अतिशय उत्तम असते. तसेच धोकादायक तीलापिया, मांगुर आणि कॅटफिश च्या इतर काही विनाशकारी माश्यांच्या प्रजातींना खाऊन नदीमध्ये अन्नसाखळी चांगली ठेवतात. (जिथे मगर असते तिथे माश्याची संख्या देखील चांगले असते). नदीमध्ये मरून पडलेल्या आणि कुजणारा गोष्टी खाऊन मगरी पाणी स्वच्छ ठेवतात.
यावेळी बचावकार्यात वनपरिक्षेत्र अधिकारी कुडाळ श्री अमृत शिंदे, वनपाल मठ श्री. चव्हाण, वनरक्षक तुळस श्री कांबळे , राहुल मयेकर, पोलीस नाईकश्री किरण पिळगांवकर तसेच स्थानिक ग्रामस्थ व पोलीस कर्मचारी यांनी यशस्वी केले. वेळीच वनविभागास कळविल्याकरिता पोलीस कर्मचारी तसेच ग्रामस्थांचे शिंदे यांनी आभार मानले.