एकदा का तुम्ही समाजकारणात पडलात की तुम्ही फक्त तुमच्या स्वतःच्या कुटुंबापुर्ते मर्यादीत न राहता पूर्ण समाजाचं तुमचं कुटुंब बनतं. त्यामुळे राजकारणात स्वतःचं दुःख विसरून दुसऱ्यांच्या हितासाठी झटाव लागतं. याचंच आज एक उत्तम उदाहरण पाट हायस्कूल येथे संपन्न झालेल्या सामाजिक उपक्रमा दरम्यान अनुभवास मिळाले. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांना आपला पुत्र गमावल्याचे दुःख आहे तर दुसरीकडे रोहित याला आपल्यावरील पित्याचे छत्र हरवल्याचे दुःख आहे. तरी सुध्दा शिवसेनेचे हे दोन निष्ठावंत नेते आपले दुःख बाजुला सारून स्वतःला समाजकार्यात झोकून घेतल्याचे दिसत आहे.
आज सकाळी पाट हायस्कूल येथे म्हापण, कोचरा,निवती येथील आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी जि. प. सदस्य कै. सुनील म्हापणकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचा मुलगा रोहित म्हापणकर यांच्यावतीने पी.पी.ई. किट, सॅनीटायझर, मास्क, हॅन्ड ग्लोज या साहित्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात कै. सुनील म्हापणकर यांच्या पवित्र आत्म्यास श्रद्धांजली वाहून करण्यात आली. याप्रसंगी बोलताना शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय पडते यांनी कै. सुनील म्हापणकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. म्हापण जिल्हा परिषद मतदार संघामध्ये सुनिल म्हापणकर हे तडफदार आणि सेवाभावी जि. प. सदस्य होते. गोरगरिबांचा कैवारी म्हणून कै. सुनिल म्हापणकर यांची ओळख होती. त्याचप्रमाणे त्यांचा मुलगा रोहित करत असलेल्या सामाजिक कार्याचे कौतुकही त्यांनी केले. आज मतदार संघातील लोकांच्या सुरक्षिततेसाठी स्वखर्चाने मतदार संघातील आरोग्य उपकेंद्रांना कोरोणाच्या पार्श्वभूमीवर साहित्य देऊन वडिलांचा सामाजिक वारसा पुढे नेत आहे. रोहितच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत त्याच्या प्रत्येक सामाजिक कार्यास माझे सहकार्य असेल. तसेच कोरोणा बद्दल बोलताना लोक ताप अंगावर काढतात टेस्ट करून घेत नाहीत त्यामुळे योग्य उपचार वेळेत भेटत नाही याच कारणाने बरेच रुग्ण दगावतात.त्यामूळे हलगर्जीपणा करू नका. आरोग्य सेवकांचे कोरोणा काळातील कार्य हे अभूतपूर्व आहे त्यामुळे आरोग्य सेवक हे देवच आहेत असेही ते पुढे म्हणाले.
याच प्रसंगी बोलताना शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई यांनी लवकरच परूळे प्राथमिक आरोग्य केंद्रात 30 बेडचे सुसज्ज कोरणा केअर सेंटर आमदार दीपक केसरकर यांच्या सहकार्यातून सुरू करण्यात येणार आहे असे सांगितले. जिल्हा रुग्णालयात ज्यावेळी आपल्या कडील रुग्ण दाखल होतात त्यावेळी ते घाबरून जातात व त्यांची प्रकृती सुधारण्यास वेळ लागतो. त्यामुळे आपल्या जवळच्या परिसरात कोरोणा केअर सेंटर सुरू झाले तर रुग्ण लवकर बरे होण्यास मदत होईल. तसेच कोरोणाबद्दल कोणीही फाजील आत्मविश्वास बाळगू नये. लक्षणे असल्यास त्वरित कोरणा चाचणी करून घेणे व स्वतःची काळजी घेणे असेही ते म्हणाले.
उपस्थित आरोग्यसेवकांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. आपण करत असलेल्या सहकार्यामुळे अधिकाधिक काम करण्याची प्रेरणा मिळत असल्याचेही त्यांनी बोलून दाखवले.
यावेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष श्री संजय पडते शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई, उपजिल्हाप्रमुख सुनिल डुबळे, तालुकाप्रमुख श्री. बाळू परब, केळूस माजी सरपंच श्री योगेश शेटये, श्री. रोहित म्हापणकर, म्हापण विभाग प्रमुख श्री. योगेश तेली, म्हापण सरपंच श्री. अभय ठाकूर, कोचरा सरपंच सौ. साची फणसेकर, कोचरा माजी उपसरपंच श्री. देवदत्त साळगावकर, युवासेना उपविभाग प्रमुख म्हापण श्री. स्वप्नील तळावडेकर, पाट हायस्कूलचे मुख्याध्यापक व सहकारी शिक्षक, डॉ. काटकर, म्हापण व कोचरा आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.