सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला पुन्हा एक नंबरचा पक्ष बनविण्यासाठी बेसिक काँग्रेस, सेवादल काँग्रेस, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस यांना एकत्र घेऊन काम करावे लागेल. शासनाच्या योजना काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवा आणि त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना करून द्या. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून जिल्हा काँग्रेसला पुर्ण पाठबळ दिले जाईल आता कार्यकर्त्यांनी मागे वळून पहायचे नाही यापुढे सर्व निवडणुका आपल्याला स्वबळार लढवायच्या आहेत आणि काँग्रेस पक्षाला सिंधुदुर्ग जिल्हात एक नंबरचा पक्ष बनवायचा आहे आणि लागणारे सर्व प्रकारचे पाठबळ कार्यकर्त्यांना दिले जाईल अशी ग्वाही महाराष्ट्र प्रदेश ओबीसी विभागाचे अध्यक्ष भानुदास माळी यांनी कुडाळ येथे जिल्ह्यातील काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकारी यांच्या बैठकीत बोलताना दिले.
या बैठकीला जेष्ठ नेते नविनचंद्र बांदिवडेकर, जिल्हा उपाध्यक्ष व प्रवक्त्ता इर्शाद शेख, ओबीसी विभाग जिल्हाध्यक्ष जगन्नाथ डोंगरे, सरचिटणीस महेंद्र सावंत, उपाध्यक्ष विजय प्रभू, सरचिटणीस प्रकाश जैतापकर, प्रदेश प्रतिनिधी सुगंधा साटम, सेवादल जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, सोशलमिडया जिल्हा अध्यक्ष केतनकुमार गावडे, जिल्हा युवक कार्याध्यक्ष किरण टेंबूलकर, सावंतवाडी तालुका अध्यक्ष महेंद्र सांगेलकर, वेंगुर्ला तालुका अध्यक्ष व नगरसेवक विधाता सावंत, दोडामार्ग तालुका अध्यक्ष वासुदेव नाईक, कणकवली तालुका अध्यक्ष प्रदिप मांजरेकर, वेंगुर्ला शहर अध्यक्ष व नगरसेवक प्रकाश डिचोलकर, कुडाळ महिला तालुका अध्यक्ष सुंदरवल्ली पडयाची, बाळू अंधारी, संदेश कोयंडे, देवानंद लुडबे, जेम्स फर्नांडिस, चंदन पांगे, सुभाष दळवी, गणेश कुर्ले, पल्लवी तारी, गोविंद कुंभार, सरदार ताजर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
भानुदास माळी बोलताना पुढे म्हणाले महाराष्ट्रातील पुढील मुख्यमंत्री हा काँग्रेस पक्षाचा असेल त्यासाठी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते कामाला लागले आहेत. आरक्षणा संदर्भात ते बोलताना म्हणाले की ओबीसीचे जे आरक्षण रद्द झाले ते आरक्षण हे फक्त राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. परंतू ते आरक्षण पुन्हा मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष कटीबद्ध आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारने मागास आयोगाची स्थापना केली आहे. मराठा आरक्षणा संदर्भात बोलताना म्हणाले की मराठा आरक्षणाचा जो पेच निर्माण झाला आहे. त्याला सर्वसी भाजप जबाबदार आहे. भाजप पक्ष हा संघाच्या विचारधारेवर चालतो आणि संघहा आरक्षण विरोधी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीनी सरकारी कंपन्या विकायला काढून या सरकारी कंपन्यात मिळणारे आरक्षण संपवण्याचा विडाच उचललेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी संघाला विकले गेले आहेत, असा घाणाघाती आरोप माळी यांनी केला.
माझी ही संवादयात्रा सिंधुदुर्गात कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी आहे. आपल्या भावना कार्यकर्त्यांनी मनमोकळेपणाने मांडा. आपल्या भावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या पर्यंत नेऊन आपल्याला पाठबळ देण्याचे काम करेन. यापुढे प्रत्येक निवडणुकीत काँग्रेस पक्ष हा जिल्ह्यात एक नंबरचा पक्ष असेल. यासाठी आपल्याला प्रदेश काँग्रेसचे पुर्ण पाठबळ असेल.