कणकवलीतील अप्पासाहेब पटवर्धन चौक हा जिल्ह्यातील सर्वाधिक वर्दळीचा चौक मानला जातो. या चौकात आचऱ्या हुन येणारा मार्ग कणकवली बाजारपेठेतून येणारा मार्ग तसेच कणकवलीच्या दोन्ही बाजूंनी येणारे सर्व्हिस रस्त्यावरचे ट्राफिक यांची सतत वर्दळ असते. याठिकाणी अप्पासाहेब पटवर्धन चौकामध्ये सर्विस रोड वर स्पीड ब्रेकर असण्याची अत्यंत आवश्यकता आहे. अनेक वेळा येथे अपघात होता होता टळले आहेत. संबंधित खातं हे अपघात झाल्यानंतरच जागे होणार आहे काय? असा सवाल जनतेतून केला जात आहे. या चौकात ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी सुद्धा या ठिकाणी एकूण चार ठिकाणी स्पीड ब्रेकर अत्यावश्यक असल्याचे म्हटले आहे. आचरा रोड जिथे सर्विस रोडला मिळतो त्या ठिकाणी तसेच बाजार पेठ मधला रोड ज्या ठिकाणी सर्विस रोडला मिळतो त्या ठिकाणी तसेच दोन्ही बाजूंनी सर्विस रोडवर स्पीड ब्रेकर असण्याची गरज आहे. परंतु याकडे संबंधित खात्याकडून दुर्लक्ष झालेले आहे. कणकवली मध्ये सर्विस रोड कडे दुर्लक्ष केल्याने चिखल फेक सारखे आंदोलन चिघळले होते. या आंदोलनात बांधकाम खाते लक्ष झाले होते. लोकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला होता. स्पीड ब्रेकर अभावी या चौकात अपघाताची दाट शक्यता असल्याने लोकात संताप आहे. संबंधित खात्याने उद्रेकाची वाट पाहू नये असा इशारा कणकवलीतील सुजाण नागरिकांनी दिला आहे.
कणकवलीत या ठिकाणी होतेय स्पीड ब्रेकर ची मागणी
- Post published:जून 16, 2021
- Post category:कणकवली / राजकीय
- Post comments:0 Comments