वैद्यकीय अधिकारी व ग्रामविस्तार अधिकाऱ्यांना दिले निवेदन
बांदा
कोरोना महामारीत आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत काम करणाऱ्या महाराष्ट्रातील आशा सेविका आणि गटप्रवर्तक बेमुदत संपावर जात आहेत. यात बांदा शहरातील आशा सेविकाही सहभागी झाल्या असून याबाबतचे निवेदन त्यांनी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील व ग्रामविस्तार अधिकारी डी. एस. अमृतसागर यांना दिले आहे.
महाराष्ट्र राज्यातील आशा व गटप्रवर्तक यांच्या अनेक मागण्या शासन स्तरावर प्रलंबित आहेत. यासाठी महाराष्ट्र आशा कर्मचारी समन्वय समिती कडून बेमुदत संपाचा इशारा देण्यात आला आहे. समिती कडून महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्र्यांनाही निवेदन देण्यात आले होते. सिंधुदुर्ग आशा वर्कर्स संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्याधिकारी यांना ही निवेदन देण्यात आले आहे.
या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व आशा आणि गटप्रवर्तक सहभागी झाले असून बांदा येथील सावली कामत, सुधा बांदेकर, राजश्री आळवे, रितिका माजगावकर, संचिता धुरी, संजना सावंत, राजश्री गावकर, अर्पिता राणे, नम्रता खानोलकर, शरयू कोठावळे, मनीषा देसाई, रिझवाना खतीब, निकिता सावंत, जागृती गवस, भाग्यलक्ष्मी मोरजकर, अस्मिता नाईक, हेमांगी गोवेकर, शीतल परब, रेश्मा परब, कविता आंबेकर, सुंदरी भोगटे, मनीषा कामत, मेघा पेडवेकर यांनी या आंदोलनात सहभागी होत असल्याचे निवेदन आचरा आरोग्य अधिकारी, ग्रामविस्तार अधिकारी, सरपंच अक्रम खान यांना दिले आहे.