You are currently viewing सिंधुदुर्गातील व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ

सिंधुदुर्गातील व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ

जगदीश मांजरेकर

सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आता व्यापाऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी योग्य ते प्रयत्न व्हावेत,अशी मागणी सावंतवाडी तालुका व्यापारी संघटनेच्या वतीने अध्यक्ष जगदीश मांजरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. दरम्यान एकीकडे मुंबईसारख्या ठिकाणी डॉक्टरांची संख्या असल्यामुळे तेथील आकडा कमी करण्यास यश आले आहे.तोच फाॅम्युला सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबवून येथे तज्ञ डॉक्टरांची टीम पाठवून सकारात्मक निर्णय घ्यावा,अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबतचे पत्र प्रसिद्धीस दिले आहे.

यात असे म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहे,अशा परिस्थितीत पुन्हा-पुन्हा लाॅकडाऊन वाढवण्यात आल्यामुळे येथील व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.हॉटेल व्यवसाय पूर्ण ठप्प झाला आहे. पार्सल सुविधा याठिकाणी चालणारे नाही, त्यामुळे कामगारांचे पगार देणे शक्य नाही.अन्य व्यावसायिक सुद्धा अडचण आले आहेत. लाईट बिल,बँकेचे हप्ते,अन्य व्यवसाय अडचणीत आले आहेत. त्यामुळे त्याबाबत तात्काळ सकारात्मक भूमिका घ्यावी,अशी मागणी श्री मांजरेकर यांच्याकडून करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा