सिंधुदुर्गनगरी
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग व त्यांचे अधिपत्याखालील तालुका विधी सेवा समितीच्या एप्रील 2020 ते मार्च 2021 या कालावधीचे लेखा परीक्षण, सनदी लेखापाल यांच्याकडून करुन घ्यावयाचे आहे. त्यासाठी इच्छूक सनदी लेखापाल यांच्याकडून दरपत्रक मागविण्यात येत आहेत.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग व त्यांच्या अधिपत्याखालील तालुका विधी सेवा समिती, सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण, कणकवली व देवगड यांच्याकडील दि. 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021 पर्यंतच्या कालावधीतील नालसा फंड, महाराष्ट्र शासनाकडून प्राधिकरणाच्या योजना, कर्मचाऱ्यांचे वेतन, कार्यालयीन खर्च याबाबतीत प्राप्त झालेल्या वेगवेगळ्या लेखाशिर्षाखालील अनुदानाबाबतच्या लेख्यांची तपासणी करणे, बॅलन्सशीट तयार करमे, स्टेटमेंट ऑफ अकाऊंट तयार करणे या संबंधित कामे करावयाची आहेत. तरी जिल्ह्यातील इच्छुक सनदी लेखापाल यांनी दि. 25 जून 2021 पर्यंत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग येथे प्रत्यक्ष किंवा dlsasindc@gmail.com या ईमेलवर त्यांची दरपत्रके पाठवावीत असे सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग हे कळवितात.