– आमदार दिपक केसरकर
दोडामार्ग
तालुक्यात कोरोना रुग्ण वाढत आहे मात्र हे प्रमाण कमी होण्यासाठी सरकारकडून प्रशासनाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन माजी पालकमंत्री व आमदार दिपक केसरकर यांनी दिले. आज दोडामार्ग कोव्हिडं आढावा बैठक त्यांनी ओंलाईन पद्धतीने घेतली.
या बैठकीला उपस्थित गट विकास अधिकारी मिलींद जाधव यांनी दोडामार्ग मधील आजच्या कोरोना परिस्थितीचा व केलेल्या उपाययोजनांचा आढावा दिला. यामध्ये ग्रामविलगिकरण कक्ष तसेच सध्याची रुग्णासख्या यावर आमदार दिपक केसरकर यांनी चर्चा करताना या कक्षासाठी येत्या दोन दिवसात १०० बेड येतील ते आवश्यक्यतेनुसार वापरा असे सांगितले तर जेवणाची व्यवस्था बचत गटांमार्फत असेल तर त्यासाठी निधीची तरतूद असून त्यांच्या अकाउंटला पैसा पाठवला जाईल त्याची अकाउंट डिटेल्स पाठवण्याचे आदेश बी डी ओ ना दिले.
सरपंचाच्या विम्या संदर्भात प्रश्न विचारला असता ज्या सरपंचांना विम्याची आवश्यक्यता वाटते त्यांनी संपर्क साधावा त्यांना विमा संरक्षण दिले जाईल असेही यावेळी आमदार दिपक केसरकर म्हणाले. तोक्ते चक्रीवादळाची नुकसान भरपाई तहसिलदारांशी बोलून लवकरात लवकर दिली जाईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या बैठकीला तहसीलदार व आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी कोणीही उपस्थित नसल्याने आरोग्य व कोरोना बाबत प्रशासन किती गंभीर आहे? हा प्रश्न अनुत्तरित राहात असून याकडे आमदार दिपक केसरकर यांनी लक्ष देणे गरजेचे बनले आहे.