कुडाळ
कुडाळ एसटी स्टँड च्या शेडचे अपुरे काम अनेक दिवस प्रलंबित राहिल्यामुळे, ऐन पावसात प्रवाशांचे अतोनात हाल होत होते. पावसात बस पकडताना प्रवासी भिजून जात असे, अर्धवट एसटी स्थानकाचे काम राहिल्यामुळे व एसटी कडे कोरोनाच्या काळात पैशाचा तुटवडा असल्यामुळे, अनेक दिवस हे काम पूर्ण झाले नव्हते. अशा कठीण प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेच्या प्रयत्नामुळे व विभाग नियंत्रक यांच्या सहकार्यामुळे कंत्राटदाराचे पैसे देणे शक्य झाले व त्यांनी आठ दिवसाच्या आत काम सुरू करून लवकरात लवकर काम पूर्ण करायची हमी दिली आहे.
सदर कामाला कुठल्याही प्रकारचे सहकार्य लागल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते मदत करणार असे महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांनी सांगितले आहे.
सांगितले आहे.