मनाच्या गाभाऱ्यात
असतात सत्य दडलेली.
काही चेहऱ्यावर दिसतात,
काही कायमची गाडलेली.
मन तयार नसतंच कधी,
त्यांना बाहेर पडू द्यायला.
मनातही हिम्मत नसते,
सत्याचा सामना करायला.
चेहरा खोटं बोलत नाही,
तो सर्व खरं सांगून जातो.
मनापुढे काही चालत नाही,
तिथेच तर सारा डाव फसतो.
मनाचा गाभारा तरी,
अजून किती राज लपवणार..
काचेसारखं असतं म्हणे मन,
कधीतरी त्यालाही तडा जाणार.
एक एक राज तेव्हा,
काचेच्या तुकड्यागत पडणार.
जरा जरी टोचला हृदयास,
तरी मन रक्तबंबाळ होणार…
मन रक्तबंबाळ होणार..
(दिपी)✒️
दीपक पटेकर.
८४४६७४३१९६