You are currently viewing वाळू माफियांच्या वाढत्या दहशतीला प्रशासनच जवाबदार

वाळू माफियांच्या वाढत्या दहशतीला प्रशासनच जवाबदार

एखाद्या चित्रपटात शोभून दिसावी अशा तर्‍हेने वाळू माफियांनी पत्रकारावर जीवघेणा हल्ला केला. जालना जिल्ह्यातील जाफराबादची ही घटना म्हणजे आपण बिहारचे की महाराष्ट्रातील ? असाच प्रश्न आहे. यामुळे पत्रकार ज्ञानेश्‍वर पाबळे यांच्यावर हल्ला करणार्‍या वाळू माफियांना त्वरीत अटक करावी. पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे प्रमुख एस. एम. देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे. या घटनेचा अध्यक्ष गजानन नाईक यांनीही तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

एखाद्या चित्रपटात शोभून दिसेल अशी घटना काल जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथे घडली असून १५ ते २० वाळू माफियांनी ज्ञानेश्‍वर पाबळे या पत्रकारावर लाठ्याकाठ्यांनी हल्ला करून जबर जखमी केले. या घटनेचा व्हीडीओ पाहिल्यावर आपण महाराष्ट्रात आहोत की बिहारमध्ये असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. यावरून अवैध वाळू उपसा करणार्‍या वाळू माफियांवर त्वरीत कारवाई करावी व या घटनेची चौकशी करावी, हल्लेखोरांना त्वरीत अटक करावी अशी मागणी महाराष्ट्र पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे प्रमुख एस. एम. देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.

तसेच मराठवाड्यात  गावागावात वाळू माफियांनी धुडगूस घातला असून नद्यांचा मोठ्या प्रमाणात उपसा सुरू आहे. तालुका प्रशासन आणि जिल्हा प्रशासन वाळू माफियांना पाठीशी घालत असल्याने वाळू माफियांची दहशत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पत्रकारांनी त्याविरोधात आवाज उठविला तर त्यांच्यावर सामुहिक हल्ले केले जात आहेत. असे देशमुख यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा