वेंगुर्ला :
युवा मोर्चा तालुकाध्यक्ष वेंगुर्ले तथा परुळे बाजार तंटामुक्ती अध्यक्ष श्री प्रसाद पाटकर यांचा १४ मे ला वाढदिवस होता. परंतु स्वतः व कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्यांना वाढदिवस साजरा करता आला नाही.
दरवर्षी समाजपयोगी उपक्रम करून वाढदिवस साजरा केला जातो. यावेळी परुळे गौतमनगर येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळाल्यामुळे वाडीतील सर्वांना कॉरंटाईन केले. वाडीतील बरीचशी कुटुंबे ही मोलमजुरी करून आपला चरित्रार्थ चालवतात त्यामुळे त्यांचे अतोनात हाल झाले. प्रसाद पाटकर यांनी गौतम नगर, चव्हाणवाडी, धनगरवाडी तसेच आजूबाजूच्या गरीब कुटुंबांना असे मिळून ११२ कुटुंबाना साबण, बिस्कीट आणि अंडी वाटप केली. याबद्दल वाडीतील ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले. परुळे पंचक्रोशीतुन या उपक्रमांबद्दल प्रसाद पाटकर मित्रमंडळाचे अभिनंदन करण्यात येत आहे.
यावेळी माजी सरपंच प्रदीप प्रभू, कुशेवाडा सरपंच निलेश सामंत, म्हापण माजी सरपंच नाथा मडवळ, पोलीस पाटील सुभाष घोलेकर, शक्ती केंद्र प्रमुख रुपेश राणे, ग्रामपंचायत सदस्य सुनील चव्हाण, संतोष करलकर, बूथ अध्यक्ष अण्णा सावंत, सीमा सावंत, जिजाई परुळेकर, भद्रायू परुळेकर, अमेय देऊलकर, अमित परुळेकर, सचिन परुळेकर, पिंटो परुळेकर, चंद्रकांत परुळेकर, नितेश परुळेकर, प्रशांत परुळेकर यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.