You are currently viewing वीरशिरोमणी महाराणा प्रताप यांची जयंती घरोघरी साजरी करावी…

वीरशिरोमणी महाराणा प्रताप यांची जयंती घरोघरी साजरी करावी…

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राणे ( महाराणा ) समाज उन्नती मंडळाचे आवाहन

राणे ज्ञाती समाजबांधवांचे प्रेरणास्थान वीरशिरोमणी महाराणा प्रताप यांची 13 जून रोजी तिथीनुसार 481 वि जयंती असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व समाजबांधव आणि महाराणा प्रातप प्रेमींनी हिंदुसूर्य महाराणा प्रताप यांची जयंती आपापल्या घरी साजरी करावी असे आवाहन राणे ( महाराणा ) समाज उन्नती मंडळ सिंधुदुर्ग च्या वतीने करण्यात आले आहे.

महाराणा प्रताप यांची जयंती सिंधुदुर्ग राणे ( महाराणा ) समाज उन्नती मंडळाच्या वतीने मोठ्या दिमाखात, उत्साहाने साजरी करण्यात येते. मात्र कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर एकत्रित जमून महाराणा प्रताप यांची जयंती साजरी करणे शक्य नाही आहे. असे असले तरी राणे समाजबांधव आणि महाराणा प्रताप प्रेमींच्या मनामनात महाराणांविषयी उत्कट प्रेम आणि आपुलकी आणि अभिमान आहे. महाराणा प्रताप यांची जयंती घरोघरी साजरी करून आपण महाराणांविषयी आपली आत्मीयता आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजभान जपावे असे आवाहन राणे ( महाराणा ) समाज उन्नती मंडळाच्या वतीने अध्यक्ष तुळशिदास रावराणे, उपाध्यक्ष भास्कर राणे, खजिनदार चंद्रशेखर राणे, सचिव मंगेश राणे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा