You are currently viewing ‘वाळू’ घेऊन लालपरी धावणार..

‘वाळू’ घेऊन लालपरी धावणार..

मालवण तोंडवळी येथून वाळू भरून कोल्हापूरला एसटी रवाना

मालवण:

लॉकडाऊन काळात एसटी वाहतूक बंद असल्याने तोट्यात असलेल्या एसटीचे उत्पन्न वाढवण्यासाठी माल वाहतुकीचा पर्याय एसटीने गतवर्षी स्वीकारला. गौण खनिज व वाळू वाहतूकही एसटीच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे. शनिवारी मालवण तोंडवळी येथून वाळू भरणा करून तालुक्यातून वाळू भरलेली पहिली एसटी कोल्हापूर येथे रवाना झाली.

दरम्यान, एसटी प्रशासनाच्या या निर्णयाचे वाळू व्यवसाईकांनी स्वागत केले आहे. लॉकडाऊनमुळे वाळू व्यवसायही अडचणीत आला असताना एसटी प्रशासनाचा नवा उपक्रम वाळू व्यवसायाच्या दृष्टीनेही हिताचाच असल्याचे काही व्यवसाईकांनी सांगितले आहे.

रीतसर वाळू वाहतूक पास घेऊन त्या त्या ठिकाणी जाण्यासाठी प्रति किलोमीटर निश्चित दरानुसार ही वाहतूक केली जात आहे. अशी माहिती मालवण एसटी आगर व्यवस्थापक नरेंद्र बोथे यांनी माहिती देताना सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा