You are currently viewing मंडप व स्पिकर व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ…

मंडप व स्पिकर व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ…

कार्यक्रम सुरु करा..अन्यथा आर्थिक मदत करा; नागेश पारगांवकर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी

कणकवली :

गेली ५० वर्षे मी मंडप व स्पिकरचा व्यवसाय करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो.सध्या स्पिकर व्यवसाय बंद असल्याने उदरनिर्वाह करता येत नाही. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने विचार करून स्पिकर व्यवसाय चालू करण्यास परवानगी द्यावी, अन्यथा आर्थिक मदत करावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे कणकवली येथील स्पिकर व्यावसायिक नागेश पारगांवकर यांनी केली आहे.

मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्पिकर व्यवसाय चालू झाले नाहीत तर उपासमारीची वेळ आली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कार्यक्रमांना परवानगी द्यावी. तसेच विरशैव लिंगायत समाज सिंधुदुर्ग या समाजाला आरक्षण कधी मिळणार ? कारण मुलांना नोकऱ्या मिळत नाहीत . लिंगायत समाजाची मुले नोकरी मिळत नसल्याने आणि शिक्षण शिकून बेकार आहेत. तरी लिंगायत समाजाच्या आरक्षणाचा विचार करावा अशी मागणीही नागेश पारगांवकर यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा