You are currently viewing कोकण रेल्वेची “विस्टाडोम” पर्यटनाला देणार चालना

कोकण रेल्वेची “विस्टाडोम” पर्यटनाला देणार चालना

सिंधुदूर्ग :

खरंतर कोकण रेल्वेच्या मार्गावर धावते त्या मार्गावर निसर्गसौंदर्य प्रत्येकाला भुरळ पाडते. आजूबाजूला डोळे सुखावणारी हिरवाई निळे आकाश डोंगरमाथे व पावसाळ्यात कोसळणारे धबधबे स्वर्गीय अनुभव देतात आणि प्रवास सुखकर होतो. मात्र नेहमी रेल्वेगाडीतून अनुभव येतोच असे नाही. प्रवाशांच्या या आवडीला डोळ्यासमोर ठेवून कोकण रेल्वेने जनशताब्दी एक्सप्रेस स्पेशल बोगी जोडून प्रवासी कोच सेवा तयार केली आहे. ही स्पेशल प्रवासी सेवा असलेली रेल्वे गाडी लॉकडाऊन नंतर पुन्हा गुरुवारी कोकण रेल्वे मार्गावरून धावली.

जनशताब्दी जोडलेल्या स्पेशल बोगीला प्रशस्त काचा बसवण्यात आले आहे. त्यामुळे या स्पेशल बोगीतील खुर्चीत बसून एक वाईड व्ह्यु अनुभव येतो. मोठमोठ्या खिडक्याबरोबरच बोगीत प्रशस्त जागा आहे. यातील खुर्च्या मागे-पुढे होतातच पण गोल फिरतात. त्यामुळे प्रवासी आपापल्या हव्या तशा खुर्च्या ऍडजेस्ट करू शकतात. या स्पेशल बोगीत फ्रिज, डीप फ्रीज, ओव्हन अशा अन्य अनेक सुविधा उपलब्ध आहेत. सर्व सोयीसुविधा असणारे ही रेल्वे पर्यटक प्रवाशांना सुखावणारी आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा