वैभववाडी :
लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर वैभववाडी बाजारपेठेतील दैनंदिन व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येत आहे. बुधवारी वैभववाडीत खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. मात्र बुधवारचा आठवड्याचा बाजार अद्याप सुरू झालेला नाही. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लावण्यात आले होते. अत्यावश्यक सेवेची दुकाने सकाळी 11 वाजेपर्यंत सुरू होती. लॉकडाऊनला शिथीलता दिल्यानंतर सोमवारपासून तालुक्यात गेले दीड महिना बंद असलेले एसटी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. शेतीच्या हंगामाला सुरुवात झाली असून शेतीसाठी लागणारे बी-बियाणे, शेती अवजारे, घरातील किराणा सामान, घर साकारण्याचे मटेरियल, पावसासाठी सुखी मच्छी, छत्र्या, रेनकोट, खरेदीसाठी नागरिकांनी दुकानासमोर गर्दी केली होती.