सावंतवाडी :
सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी कळसुलकर संस्थेच्या विद्यमान संचालक मंडळाला २ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘माझी शाळा माझी जबाबदारी’ अभिमान सुरू करण्यात आले आहे. संस्थेच्या विद्यमान संचालक मंडळाला नुकताच २ वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाला. मात्र हा संपूर्ण कालावधीत कोरोना मुळे काम करण्यास पुरेशी मोकळीक मिळाली नाही. तरीही व्यवस्थापक मंडळाने सर्व सभासद, माजी विद्यार्थी, देणगीदार, पालक-शिक्षक, हितचिंतक यांच्या सहकार्याने काही बदल घडवून आणण्यासाठी काही नवे प्रयोग करण्याचा प्रयत्न केला आहे. या निमित्ताने माजी विद्यार्थी सभासद यांनी सुचविलेल्या “शाळेत माझी शाळा माझी जबाबदारी” अभियान सुरू करण्यात आले आहे. वर्षभरात फक्त किमान एकदा शाळेचा माजी विद्यार्थी म्हणून मी काय करू शकतो ? हे प्रत्येकाने कळवायचे असून बक्षीस देणे प्रत्येकाने आर्थिक स्वरूपातच काही करावे अशी सक्ती नाही. पण आपली शाळा म्हणून आपल्या क्षमतांचा शाळेला कसा उपयोग करून देता येईल हे पाहणे. स्पर्धा घेणे, कार्यशाळा घेणे असे अनेक उपक्रम संचालक माजी विद्यार्थी सभासद यांनी करावयाची असून शाळा आपलीच आहे आपल्यालाच पुढे न्यायची आहे. हे लक्षात घेऊन या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष शैलेश पै यांनी दिले आहे.