मालवण :
येत्या ३ दिवसात जिल्ह्यात जोरदार पावसासह होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीकरिता जाऊ नये, अशी सूचना मत्स्यव्यवसाय विभागाने केली आहे. ११ ,१२ व १३ जून रोजी जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. या दरम्यान ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. या वेळी समुद्र खवळलेला राहणार आहे. त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये. मच्छीमार बांधवांनी आपल्या मच्छीमार साहित्याची काळजी घ्यावी. तसेच मत्स्यसंवर्धकांनी बांध बंदिस्त करून आपल्या मस्य साठयाची काळजी घ्यावी. याबाबत सर्व मत्स्य सहकारी संस्था नौका मालक मच्छीमार यांनी नोंद घ्यावी, असे आव्हान मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त यांनी केली.