कोणत्याही आर्थिक भूलथापांना बळी न पडता संपर्क साधून खात्री करावी
– जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनीत म्हात्रे
सिंधुदुर्गनगरी
कोरोना कालावधीत दोन्ही पालक गमावलेल्या अनाथ बालकांच्या बाबतीत व्हॉट्स ॲप तसेच अन्य प्रसार माध्यमांमार्फत प्रसिद्ध होणाऱ्या कोणत्याही आर्थिक भूलथापांना बळी पडू नेये. याबाबत कोणतेही मार्गदर्शन अथवा मदत अपेक्षित असल्यास जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय – 02362- 228869 वर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, विनीत म्हात्रे यांनी केले आहे.
कोरोना 19 च्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोरोना काळात दोन्ही पालक कोरोनामुळे गमावलेल्या अनाथ बालकांच्या काळजी व संरक्षणाच्या अनुषंगाने जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. अशा बालकांच्या बाबतीत काही माहिती उपलब्ध असल्यास अथवा अशा प्रकारची बालके आढळून आल्यास या बालकांच्या भविष्यकालीन पूनर्वसनाच्या दृष्टीने जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय येथे संपर्क साधावा, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.