सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक 95 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 50 पूर्णांक 275 मि.मी पावसाची नोंद झाली झाली आहे. 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 177.75 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 55(163), सावंतवाडी – 37(217), वेंगुर्ला – 64.2 (106), कुडाळ – 47(136), मालवण – 95(252), कणकवली – 14(163), देवगड – 55(199), वैभववाडी – 35(186), असा पाऊस झाला आहे.