You are currently viewing क्वारंटाईन व्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण; २४ तासात कोरोना बाधित रुग्ण घरी परतले

क्वारंटाईन व्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण; २४ तासात कोरोना बाधित रुग्ण घरी परतले

कुडाळ :

कुडाळ तालुक्यातील घावनाळे नमसवाडी येथील येथील क्वारंटाईन कक्षातील ५ कोरोना बाधित रुग्ण अवघ्या २४ तासाच्या आत आपल्या घरी परतले. त्यामुळे या क्वारंटाईन व्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण झाले आहे. याबाबत अहवाल कुडाळ तहसीलदारांकडे सादर करत असल्याचे घावनाळे गाव कोरोना सनियंत्रण समिती कमिटीचे अध्यक्ष तथा तलाठी श्री. ढवळे यांनी सांगितले.

जिल्ह्यात कुडाळ तालुका कोरोना बाधित रुग्णांमध्ये नंबर १ वर आहे. तालुक्यात बाधित रुग्णांची वाढती संख्या होम क्वारंटाईनचे नियम न पाळल्याने वाढत आहे. म्हणून प्रशासनाने होम क्वारंटाईन बंद करून ग्रामपंचायत स्तरावर कक्ष सुरू केले आहे. त्यानुसार घावनाळे ग्रामपंचायतीने नमसगाव येथील जि.प. शाळेत क्वारंटाईन कक्ष सुरू केला आहे. त्या कक्षात रविवारी गावातीलच ५ कोरोना बाधित रुग्ण दाखल झाले होते. मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी हे पाचही रुग्ण आपल्या घरी परतले. बहुदा कक्षाची व्यवस्था चांगली नसल्याने ते रुग्ण घरी गेल्याची चर्चा आहे. मात्र या प्रकारामुळे प्रशासनाचे या क्वारंटाईन व्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण होत आहे.

या क्वारंटाईन कक्षाची देखरेख पाहणाऱ्या गाव संनियंत्रण कृती कमिटीचे सहअध्यक्ष तलाठी श्रीमती ढवळे यांच्याशी संपर्क साधला असता आपण याबाबतचा अहवाल कुडाळ तहसीलदार अमोल पाटील यांच्याकडे सादर करणार असल्याचे सांगितले. तसेच तालुक्यात आणखी एका क्वारंटाईन कक्षात कोरोना बाधित रुग्णांने आरोग्य सेविकाला दम दिल्याची घटना घडली आहे. मात्र स्थानिक पातळीवर हे प्रकरण मिटविण्यात आल्याचे सांगण्यात आल

प्रतिक्रिया व्यक्त करा