अँड.अनिल केसरकर
खणिकर्म विभागाच्या निधीमधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही प्राथमिक आरोग्य केंद्राना शासनामार्फत रुग्णवाहीका देण्यात आलेल्या आहेत मात्र या रुग्णवाहिकांचे श्रेय कोणी घ्यायचे याबाबत सत्ताधारी व विरोधी पक्ष यांच्या मध्ये रस्सीखेच चालू असल्यामुळे या रुग्णवाहिका जाग्यावर उभ्या आहेत. तर काही रुग्णवाहिका या प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्यानंतर पुन्हा माघारी बोलावण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शेकडो संसार उध्वस्त झाले आहेत. हजारो नागरिक गावागावात या आजाराने त्रस्त आहेत. वेळेवर ऑक्सिजन, वेंटीलेटर उपलब्ध होत नसल्याने अनेकांचे प्राण जात आहेत. या जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेत असलेल्या त्रुटीवर उपाययोजना करण्याऐवजी नको त्या श्रेयवादामुळे सामान्य जनता भरडली जात आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त रुग्ण व सर्वांत जास्त रुग्ण दगावण्याची संख्या जास्त असलेल्या आपल्या जिल्हात रुग्णवाहिकेंच्या श्रेयवादावरून चालू असलेली राजकीय नौटंकी हि आपला जिल्हा आरोग्यसेवेत मागे का राहिला याचे जिवंत उदाहरण असल्याची टिका मनसेचे माजी उपजिल्हाअध्यक्ष अँड.अनिल केसरकर यांनी केली आहे.