माजी जी. प.अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, माजी पं. स. सदस्य छोटू ठाकूर, मर्ढे सरपंच संदीप हडकर, शिवसेनेचे माजी विभागप्रमुख राजा कोरगावकर, युवासेनेचे अमित भोगले यांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे मसुरे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहिका देण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेऊन आमदार वैभव नाईक यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे पाठपुरावा करून मसुरे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नवीन रुग्णवाहिका मंजूर करून दिली आहे. सिंधुदुर्ग खनिकर्म विभागाच्या निधीतून हि रुग्णवाहिका देण्यात आली आहे. सिंधुदुर्ग मध्ये रुग्णवाहिका दाखल झाली असून लवकरच मसुरे प्रा.आ.केंद्राकडे सुपूर्त करण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णांना याचा लाभ होणार आहे.
आ. वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून जिल्हा खनिकर्म अंतर्गत मसुरे प्रा. आ. केंद्रासाठी नवीन रुग्णवाहिका मंजूर
- Post published:जून 8, 2021
- Post category:कुडाळ / बातम्या
- Post comments:0 Comments
You Might Also Like
वेंगुर्लेत प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाच्या वतीने “बारा ज्योतिर्लिंग दर्शन” उपक्रम…
काव्यात्मा साहित्य परिषद,पुणे तर्फे ज्येष्ठांचा पुरस्कार वितरण सोहळा व निमंत्रित काव्यसंमेलन संपन्न
महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचे सिंधुदुर्ग जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष यांनी पदाधिकाऱ्यांसह केले दाभोळी विमानतळावर भव्य स्वागत
