*जिल्हापरिषद अध्यक्षांची संकल्पना*
कणकवली :
जि. प. शाळा नाटळ खांदारवाडी येथे सर्व सोयींनी युक्त असे कोवीड कोवीड सेंटरचे उद्घाटन आ. नीतेश राणे यांच्या हस्ते झाले.
जि. प.अध्यक्षा सौ. संजना सावंत, माजी जि. प. अध्यक्ष संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांच्या संकल्पनेतून हे कोविड सेंटर सुरू करण्यात येत आहे. या कोवीड सेंटरमध्ये सांगवे, कुंभवडे, नाटळ, दिगवळे, नरडवे, दारिस्ते व शिवडाव गावातील कोवीड रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत.
प्रस्तावित ३५ बेडचे हे कोवीड सेंटर सर्व सोयींनी सुसज्ज करण्यात आले आहे. या कोवीड सेंटरमध्ये २४ तास डॉक्टर व नर्स सेवा उपलब्ध, अॉक्सिजन कॉन्संट्रेटर, सर्व प्रकारची औषधे व वैद्यकीय साहित्य, जेवण व नाश्ता, दूध, अंडी, सूप इत्यादी पौष्टिक आहार, प्रत्येक रुम मध्ये टीव्ही, अद्यावत बेड सुविधा, स्वतंत्र फॅन, स्वछ व शुध्द पाण्यासाठी वॉटर प्युरिफायरची सुविधा, आंघोळीसाठी गरम पाणी, इलेक्ट्रिक गिजर उपलब्ध, इनडोअर खेळाचे साहित्य, वैयक्तिक स्वचछतेचे साहित्य या सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
तसेच कोविड सेंटरचा पूर्ण परिसर CCTV च्या निगराणी खाली असून स्वतः जि प अध्यक्ष सौ संजना सावंत यांचा यावर लक्ष असणार आहे.
जि. प. अध्यक्षा संजना सावंत, माजी जि. प. अध्यक्ष संदेश सावंत, मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजित नायर, कणकवली तहसिलदार रमेश पवार, कणकवली सभापती मनोज रावराणे, उपसभापती प्रकाश पारकर, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. संजय पोळ, तसेच नाटळ मतदार संघातील सर्व सरपंच, उपसरपंच आदी उपस्थित होते.