शिवछत्रपती राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून ‘आम्ही बालकवी सिंधुदुर्ग’ या सामाजिक संस्थेमार्फत ‘मिरगोत्सव’ या ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमात ३० बालकवी विद्यार्थी, त्यांचे पालक, काही शिक्षक व शिक्षण प्रेमी यानी मोठ्या उत्साहाने सहभाग दर्शविला.
कार्यक्रमाची बहुतांश जबाबदारी सर्व बालचमुनीच पार पाडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी तनिष्का सावंत, दीपप्रज्वलन व इशस्तवन कु.वैभवी रेडकर, सूत्रसंचालन कु.सिद्धी सोसे व मैत्रेयी हीर्लेकर, प्रस्तावना जुई परब ,आभार सौ.प्रणाली सावंत यांनी मानले. अशा प्रकारे प्रत्येकाने आपली जबाबदारी अतिशय छान प्रकारे पार पाडली. तसेच सर्व सहभागी बालचमूनी आपापले सादरीकरण उत्कृष्ट सादर केले. कोणी शिवाजी महाराजांचा पोवाडा, कोणी पावसावर कविता, गाणी, गोष्टी तर कोणी हार्मोनियमच्या तालावर गीते सादर केली. अशा विविध अंगानी नटलेल्या या कार्यक्रमाची धुरा सौ. देवयानी आजगावकर व संस्थेचे अध्यक्ष श्री. राजेंद्र गोसावी यानी सांभाळली. पालकांनी आपली मते व्यक्त केली व कार्यक्रमाचे कौतुक केले. या ऑनलाईन कार्यक्रमातून मुलांनी खूप मज्जा केली. जणू काही शाळेत गेल्यासारखच वाटलं. विशेष म्हणजे हे सहभागी बालचमू महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील होते.
आम्ही बालकवी सिंधुदुर्ग संस्थेतर्फे नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. बाल समूहांच्या स्पर्धांमुळे अनेक लहान मुलांना हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. त्यामुळे आपल्या कलागुणांना वाव देता येतो. संस्थेतर्फे विविध गटांमध्ये काव्य वाचन, काव्य लेखन इत्यादी स्पर्धांबरोबर असहाय्य गरजू गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देखील दिली जाते.