सावंतवाडी
मळेवाड कोंडूरे ग्रामपंचायतीकडून कोरोना काळात काम करणाऱ्या आशा ताईंना आर्थिक मानधन देण्यात आले आहे. सरपंच हेमंत मराठे यांच्याकडून ग्रामपंचायतमार्फत त्यांना आर्थिक स्वरूपातील मदतीचे धनादेश सुपूर्त करण्यात आले. यावेळी ग्राम विस्तार अधिकारी अनंत गावकर, ग्रा. प. सदस्य सानिका शेवडे, पोलीस पाटील दिगंबर मसुरकर उपस्थित होते.
कोरोना संक्रमण सूरू असून गावातील कोरोना रुग्ण संख्या कमी करून गावातली कोणाचे साखळी तोडण्यासाठी आशा, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी लोकप्रतिनिधी, सेवाभावी संस्था, सामाजिक कार्यकर्ते आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत.यात आशा ह्या घरी जाऊन स्तनदा माता गरोदर स्त्रिया वयोवृद्ध ग्रामस्थ तसेच कोरोना सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्ती यांच्या घरोघरी जाऊन सगळे करत आहेत.
आशा ताईंना सरकार कडून दिलेले मानधन हे तुटपुंजी असतानाही कोरोनाची भीती न बाळगता कोरोना योद्धा म्हणून काम करणाऱ्या आशाताईंना मळेवाड कोंडूरे सरपंच हेमंत मराठे यांच्याकडून ग्रामपंचायत मार्फत आर्थिक स्वरूपातील मदतीचे धनादेश सुपूर्त करण्यात आले. आपण करत असलेल्या कामाची दखल घेऊन आर्थिक स्वरूपात ग्रामपंचायतने जी मदत केली त्याबद्दल आम्ही ग्रामपंचायतचे आभारी आहोत असे आशाताईंनी सांगितले.