You are currently viewing अखेर ती महिला पोलीस स्टेशनमध्ये

अखेर ती महिला पोलीस स्टेशनमध्ये

तक्रार अर्ज दाखल

कुडाळ येथील फळ विक्रेती पीडित महिलेने अखेर दात पडक्या आप्पाच्या विरोधात कुडाळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दाखल केला. दात पडक्या आप्पाकडून होत असलेल्या शारीरिक आणि मानसिक त्रासाबद्दल दिला तक्रार अर्ज.
दात पडक्या आप्पाच्या विरोधात दिलेल्या तक्रार अर्जात, दात पडक्या आप्पा आपल्याला मोबाईल वरून अश्लील व्हिडिओ पाठवतो, मेसेज करून मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करतो व आपले पती यांना जीवे ठार मारण्याची धमकी देतो, वारंवार आपल्याला भेटायला बोलावतो असे म्हटले आहे. दिनांक २९ एप्रिल रोजी दात पडक्या आप्पा आपल्या घरी रात्री ९.३० वा. आंबे विकत घेण्याचा निमित्ताने आला व घरात घुसून आपल्याशी गैरवर्तन केले. आपण आरडाओरडा केल्यावर आपले पती व त्याचवेळी आंबे नेण्यासाठी आलेली दळवी नामक दुसरी व्यक्ती यांनी आप्पाला समज दिली होती व यापुढे अशी चूक होणार नाही, मेसेज व व्हिडीओ पाठविणार नाही अशाप्रकारे माफी मागितल्याने पोलिसात रीतसर तक्रार दाखल केली नव्हती अशीही माहिती त्या महिलेने आपल्या तक्रार अर्जात दिली आहे.
या घटनेनंतर दात पडक्या आप्पाने, तू माझ्याशी लग्न केलं नाहीस तर तुझ्या पतीला ठार मारणार अशी धमकी दिल्याने दात पडक्या आप्पापासून आपल्या पतीच्या जीवाला धोका असल्याचे नमूद करत, दात पडक्या आप्पाच्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी व आपल्याला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी पीडित महिलेने केली आहे.
पैशांच्या जोरावर फळ विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या गरीब महिलेशी गैरवर्तन करून दुसऱ्याची पत्नी असून देखील लग्नाची मागणी करणे म्हणजे समाजात एखाद्या महिलेला तिचे जीवन सुखाने जगू न देण्यासारखे आहे. आपल्या कामेच्छा पूर्ण करण्यासाठी दात पडक्या आप्पासारखे गैरधंद्यातून अमाप पैसे कमावणारे जुगार दारू आणि अंमली पदार्थांचे तस्कर गोरगरीब महिलांवर अत्याचार करतात आणि आपले कायदे त्यांना कडक शासन न करता त्यांच्या विरोधात केवळ समज देण्यासाठीचे अर्ज घेतात हे देखील न कळण्यासारखे आहे. एखाद्या स्त्रीवर अत्याचार होत असेल, तिला तिचे जीवन जगण्यासाठी अडचणी निर्माण केल्या जात असतील तर प्रकरण वेगळ्या वळणावर जाण्या अगोदरच त्याचा बिमोड केला गेला तरच समाजातील धनदांडगे पैशांच्या जोरावर जोर जबरदस्ती करणारे दात पडक्या आप्पासारखे लोक वठणीवर येतील, अन्यथा महिलांवरील अत्याचार वाढतच जातील.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 1 =