सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोविड चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता प्रयत्न तोकडे पडू लागले आहेत. जिल्ह्यात कोरोनाची वाढती रुग्ण संख्या आटोक्यात आणण्याकरिता अनेक उपाय योजना राबवून देखील त्याला यश येताना दिसत नाही. कणकवली तालुक्यात आज कोरोना ची उचांकी रुग्णसंख्या आली असून कणकवली तालुका हा जिल्ह्यात कोरोना च्या हिटलिस्टवर आला आहे.
कणकवली तालुक्यात आज 114 कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून, कणकवली शहर 16, कासार्डे मध्ये तब्बल 36, तरळे 1, आयनल 1, सातरल 2, कलमठ 6, करंजे 1, कसवण 1, दारिस्ते 1, ओटव 4, कोळोशी 2, तरंदळे 6, हरकुळ बुद्रुक 2, नाटळ 4, वरवडे 5, फणसनगर 7, कासरल 5, बिडवाडी 1, खारेपाटण 2, शिडवणे 1, सांगवे 1, फोंडा 3, शिवडाव 6 असे एकूण 114 पॉझिटिव्ह रुग्ण तालुक्यात सापडले. तर कणकवली शहरातील दोन व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला.