You are currently viewing युवा उद्योजक सचिन नारकर यांचे निधन

युवा उद्योजक सचिन नारकर यांचे निधन

कणकवली

फोंडाघाट मधील दैनिक पुढारीचा उभरता पत्रकार सचिन शामराव नारकर( ४८ वर्षे )याचे कोरोनाचा कोल्हापूर येथे उपचार सुरू असताना दहा दिवसांपूर्वी निधन झाले होते. परंतु त्यांच्या कौटुंबिक अपरिहार्यतेमुळे त्यांनी काल सचिनच्या निधनाच्या निर्णय सर्वांना जाहीर केला. त्याच्या जाण्याने नारकर कुटुंबीयांना आणि मित्र परिवाराला फार मोठा धक्का बसला आहे. सचिनच्या दुःखाला फोंडाघाट मध्ये त्याच्या कुटुंबियांनी आणि मित्रपरिवाराने आवेगाने वाट करून दिली. मनमिळावू सुस्वभावी, पारदर्शक व्यक्तिमत्व, आणि व्यवसायात सर्वांशी सामजस्याची वागणूक यामुळे सचिनची “मित्रांचा मित्र” अशी ओळख होती. संस्कृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून गुढीपाडव्याची शोभायात्रा त्याच्या सांस्कृतिक कार्य कार्याची झलक होती. विनोद स्टोअर्सची सर्वांगीण बांधणी त्याने यशस्वीरित्या केली होती.

चंद्रराज लोणचे कंपनीचे मालक व पत्रकार संघाचा उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार प्राप्त दिनेश नारकर यांचे ते बंधू होत तर समाजवादी साथी शामराव नारकर यांचे ते सुपुत्र होत. त्यांचे पश्चात वडील, भाऊ, पत्नी, दोन मुलं, बहिणी आणि मोठा परिवार आहे. सचिनच्या अचानक जाण्याने फोंडाघाट परिसर आणि पेठेमध्ये तीव्र शोक व्यक्त होत आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा