You are currently viewing आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरपंचांना करणार मार्गदर्शन..

आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरपंचांना करणार मार्गदर्शन..

*कोरोना मुक्त गाव होण्यासाठी  आदर्श सरपंच पोपटराव पवार यांचे zoom अँप वरून मार्गदर्शन*

सिंधुदूर्ग :

आदर्श गाव हिवरे बाजारचे आदर्श सरपंच पोपटराव पवार यांनी आपले गाव कोरोना मुक्त केले आहे. पोपटराव पवार यांचे मार्गदर्शन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरपंच व सदस्यांना व्हावे. याकरिता भाजपा आमदार नितेश राणे यांनी यशस्वी प्रयत्न केले आहेत. शनिवार ५ जून रोजी zoom अँप वरून हे मार्गदर्शन केले जाणार आहे. तसे आमदार नितेश राणे यांनी ट्विट करून आणि कणकवली येथे सरपंचांच्याव मिटिंग मध्ये सुद्धा जाहीर केले आहे. आमदार नितेश राणे यांनी पुढील प्रमाणे ट्विट केले आहे.

“आदर्श गाव हिवरे बाजारचे आदर्श सरपंच मा. पोपटराव पवार जी यांनी आपले गाव कोरोना मुक्त ठेवले आहे. ५ जून २०२१ रोजी सकाळी ११ वाजता zoom च्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरपंचांना आपले गाव कोरोना मुक्त ठेवण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत.

*मा.पोपटराव पवार यांचे आभार !* ”

आदर्श सरपंच पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शना मुळे जिल्ह्यातील वाढणारी कोरोना रुग्ण संख्या निश्चितच कमी होण्यास मदत होणार आहे. सरपंच, उपसरपंच आणि सदस्य यांना गावात काय उपाययोजना राभवाव्यात या बद्दल संभ्रम आहे या मार्गदर्शना नंतर सरपंचांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील असा विश्वास आहे. दरम्यान आमदार नितेश राणे यांनी यापूर्वी सरपंच परिषद घेऊन पोपटराव पवार याचे मार्गदर्शन ठेवले होते. त्याच प्रमाणे या मार्गदर्शनाचा फायदा जिल्ह्याला होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा