You are currently viewing एम.टी.डी.सी.च्या बोगस नियुक्ती पत्रांना बळी पडू नये

एम.टी.डी.सी.च्या बोगस नियुक्ती पत्रांना बळी पडू नये

प्रादेशिक अधिकारी दीपक मानेंचा खुलासा

सिंधुदुर्गनगरी

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या बोगस लेटर हेडचा व शिक्क्याचा वापर करून कोणी अज्ञात व्यक्ती काही उमेदवारांना नोकरी बाबतची नियुक्ती पत्र देत असल्याचे दिसून आले आहे. अशा नियुक्ती पत्रांना बळी पडू नये, असा खुलासा मपविम कोकण विभागाचे प्रादेशिक अधिकारी दीपक माने यांनी केला आहे.

            श्री माने यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात म्हंटले आहे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ कोकण विभाग यांच्यामार्फत कोणत्याही पद्धतीची नोकर भरती जाहिरात प्रसिद्ध केली नाही व कोणत्याही उमेदवारांची नियुक्ती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, कोकण विभागाकडून केलेली नाही. अज्ञातामार्फत गरजू उमेदवारांना गाठून अशा बोगस नियुक्ती पत्राआधारे त्यांची आर्थिक व मानसिक फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी अशा बोगस नियुक्तीपत्रांना व जाहिरातींना बळी पडू नये. ज्या उमेदवारांची फसवणूक झाली असेल त्यांनी सबंधिता विरुद्ध तक्रार दाखल करावी. याबाबत आवश्यक माहितीसाठी प्रादेशिक कार्यालय, मपविम, रत्नागिरी कोकण विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, ए विंग, पहिला मजला, जयस्तंभ, रत्नागिरी येथे संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा