You are currently viewing 45 वर्षांखालील पत्रकारांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू!

45 वर्षांखालील पत्रकारांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू!

जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांनी पत्रकारांना लसीकरण करण्याचे दिले आदेश

कणकवली

सिंधुदुर्गात ४५ वर्षांखालील पत्रकारांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण आजपासून सुरू झाले आहे.
जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांनी आपल्या अधिकारांचा वापर करत जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना सिंधुदुर्गातील ४५ वर्षांखालील पत्रकारांना लसीकरण करण्याचे आदेश दिले आणि आज २ जून रोजी कणकवली तालुक्यातील पत्रकारांना कोव्हीड प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू झाले आहे.

४५ वर्षांखालील पत्रकारांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू करावे, अशी आग्रही मागणी पत्रकार संघटनांकडून मुख्यमंत्र्यांपासून ते राज्याच्या राज्यपालांकडे करण्यात येत आहे. कोरोना काळात स्वतःच्या जीवाची बाजी लावून वृत्तांकनासाठी फिल्डवर्क करणारे आणि त्या बातम्या जगभरात पोचवणारे पत्रकार यांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून कोरोना लस द्यावी, अशी मागणी पत्रकार संघटना करताहेत. सिंधुदुर्गातही अगदी पालकमंत्र्यांपासून ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत याबाबत मागणी करण्यात आली. मात्र शाब्दिक आश्वासनांपलीकडे पत्रकारांना काहीच मिळाले नाही. जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांनी आपल्या अधिकारांचा वापर करत जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना सिंधुदुर्गातील ४५ वर्षांखालील पत्रकारांना लसीकरण करण्याचे आदेश दिले. आणि २ जून रोजी कणकवली तालुक्यातील पत्रकारांना कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू झाले. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांचे तालुक्यातील पत्रकारांनी आभार व्यक्त केले आहे.

 

 

 

 

जे राज्यात झाले नाही त्याची सुरुवात सिंधुदुर्गात झाली आहे. 45 वर्षांखालील पत्रकारांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू करावे, अशी आग्रही मागणी पत्रकार संघटनांकडून मुख्यमंत्र्यांपासून ते राज्याच्या राज्यपालांकडे करण्यात येत आहे. कोरोना काळात स्वतःच्या जीवाची बाजी लावून वृत्तांकनासाठी फिल्डवर्क करणारे आणि त्या बातम्या जगभरात पोचवणारे पत्रकार यांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून कोरोना लस द्यावी, अशी मागणी पत्रकार संघटना करताहेत. सिंधुदुर्गातही अगदी पालकमंत्र्यांपासून ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत याबाबत मागणी करण्यात आली. मात्र शाब्दिक आश्वासनांपलीकडे पत्रकारांना काहीच मिळाले नाही. जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांनी आपल्या अधिकारांचा वापर करत जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना सिंधुदुर्गातील 45 वर्षांखालील पत्रकारांना लसीकरण करण्याचे आदेश दिले. आणि आज 2 जून रोजी कणकवली तालुक्यातील पत्रकारांना कोव्हीड प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू झाले. जे राज्यात होऊ शकले नाही त्याची सुरुवात सिंधुदुर्गात झाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा