You are currently viewing दोडामार्ग तालुक्याच्या विकासाचे नवीन पर्व सुरू होईल – अमित सामंत

दोडामार्ग तालुक्याच्या विकासाचे नवीन पर्व सुरू होईल – अमित सामंत

दोडामार्ग :

दोडामार्ग तालुक्यातील रस्ते, आरोग्य क्रीडा संकुल, तिराळी धरण क्षेत्रातील प्रश्न गंभीर असून त्यादृष्टीने या विकासात्मक कामासाठी प्रसंगी वेळ पडल्यास जनतेच्या हितासाठी शासनाविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी आज दोडामार्ग येथे दिला
आज दोडामार्ग येथे राष्ट्रवादी कार्यकर्ता बैठक पार पडली यावेळी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला यात प्रामुख्याने तालुक्यातील युवा नेतृत्व संदेश वरक यांसह अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा वरिष्ठांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या पुढे दोडामार्गच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

राष्ट्रवादी पक्ष सत्तेत असल्याने पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ज्या लोकांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे त्या सर्वांचे आम्ही स्वागत केले असून त्या सर्वांचा योग्य सन्मान राष्ट्रवादी पक्ष करेल या सर्वांबरोबर राष्ट्रवादीच्या इतर पदाधिकाऱ्यांच्या साथीने दोडामार्ग तालुक्याच्या विकासाचे नवीन पर्व सुरू होईल यासाठी येथील आरोग्य प्रश्न, रस्ते, तसेच तिलारी धरण क्षेत्रातील प्रश्न व मुख्यत्वेकरून क्रीडा संकुलाचा प्रश्न प्राधान्याने सोडविला जाईल यासाठी वेळ पडल्यास प्रसंगी शासनाविरोधात जनतेच्या हितासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशाराही अमित सामंत यांनी दिला. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते कृष्णा उर्फ उल्हास नाईक यांची राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या तालुकाध्यक्षपदी तर संदेश वरक यांची भटक्या विमुक्त जाती व जमातीच्या दोडामार्ग तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे पत्र राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुरेशभाई दळवी यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर अमित सामंत यांसह सुरेशभाई दळवी, अशोक पवार, पुंडलिक दळवी , अनंत पिंळणकर, बाबी ऊर्फ महादेव बोर्डेकर, बाबा खतीब, संदीप गवस, भास्कर परब, सुदेश तुळसकर, शिवाजीराव घोगळे, समीर भालयेकर, हिदायतुल्ला खान, नवल साटेलकर, प्रदीप चांदेलकर, सुशांत राऊत उल्हास नाईन,सुखदेव पिंपळे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा