राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढाकार
सावंतवाडी
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या माध्यमातून म्हाडा अंतर्गत ५० बेडच सर्व सोयींनीयुक्त अत्याधुनिक पद्धतीचे रुग्णालय उभे करण्यात येत आहे. अद्ययावत व्हेंटीलेटर, ऑक्सिजन बेडच हे रूग्णालय जिल्हा रुग्णालयाशेजारी उभारण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी यांना प्राप्त झाले.
मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. तर भविष्यात रूग्णसंख्या वाढल्यास १०० बेड इथं उपलब्ध करून दिले जाणार आहे. या रुग्णालयासाठी लागणारा स्टाफ, डॉक्टर यांच्या बाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचाशी चर्चा झाली असून त्यांनी ही पुर्तता करण्याचं आश्वासन दिलं अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, काका कुडाळकर, अनंत पिळणकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, अशोक पवार, शफिक खान आदी उपस्थित होते.