You are currently viewing ग्रामीण भागातील जनतेला कोरोना उपचाराच्या खर्चात मोठा दिलासा..

ग्रामीण भागातील जनतेला कोरोना उपचाराच्या खर्चात मोठा दिलासा..

जास्त दर आकरणाऱ्या रूग्णालयांच्या लुटीला बसणार चाप; सरकारचा मोठा निर्णय

 

राज्यातील खासगी रुग्णालयांना कोविड उपचारासाठी अवास्तव दर लावता येणार नाहीत. कारण रुग्णालयांचे दर शहरांच्या वर्गीकरणानुसार ठरवण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अधिसूचनेस मंजुरी दिलीय. त्यामुळे आता  ग्रामीण भागातील जनतेला कोरोना उपचाराच्या खर्चात मोठा दिलासा मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सर्व सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. शिवाय जास्त दर आकारणाऱ्या रूग्णालयांच्या लुटीला चाप बसणार आहे. 

👉जनरल वॉर्डचे दर

▪️अ’ वर्ग शहरांसाठी ४ हजार रूपये

▪️’ब’ वर्ग शहरांसाठी ३ हजार रूपये

▪️’क’ वर्ग शहरांसाठी २ हजार ४०० रूपये

👉फक्त ICU आणि विलगीकरणाचे दर

▪️’अ’ वर्ग शहरांसाठी ७ हजार ५०० रूपये

▪️’ब’ वर्ग शहरांसाठी ५ हजार ५०० रूपये

▪️’क’ वर्ग शहरांसाठी ४ हजार ५०० रूपये

👉व्हेंटिलेटर ICUविलगीकरणाचे दर

▪️’अ’ वर्ग शहरांसाठी ९ हजार रूपये

▪️’ब’ वर्ग शहरांसाठी ६ हजार ७०० रूपये

▪️’क’ वर्ग शहरांसाठी ५ हजार ४०० रूपये

यामध्ये आवश्यक देखरेख, नर्सिंग, चाचण्या, औषधे, बेड्सचा खर्च, जेवण हे समाविष्ट करण्यात आले आहे. तर मोठ्या चाचण्या व तपासणी, उच्च पातळी वरची औषधे हे समाविष्ट नाही. कोविड चाचणीचा खर्च निश्चित केलेल्या दराप्रमाणे असेल.

◼️’अ’ वर्ग शहरांमध्ये मुंबई महानगर क्षेत्रांचा समावेश असणार आहे. पुणे, पुणे महानगर क्षेत्र आणि नागपूर या शहरांचा देखील समावेश आहे. तर यामध्ये भिवंडी, वसई-विरार हे क्षेत्र वगळण्यात आले आहेत.

◼️’ब’ वर्ग शहरांमध्ये नाशिक औरंगाबाद, अमरावती, भिवंडी, सोलापूर, कोल्हापूर, वसई-विरार, सांगली, मालेगाव, नांदेड या शहरांचा देखील समावेश आहे.

◼️’क’ वर्ग भगात अ आणि ब वर्ग शहरांव्यतिरिक्त इतर सर्व जिल्हा मुख्यालय शहरांचा समावेश असणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा