राज्यात ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत आहे. तिथं आजपासून निर्बंधात शिथिलता दिली गेली आहे. मात्र, सिंधुदुर्ग जिल्हा आजपासून रेड झोन जाहीर करण्यात आला आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार खारेपाटण, आंबोली, करूळ,व गोवा जिल्ह्यातील सीमा आजपासून बंद करण्यात आल्या आहेत. यापूर्वी जिल्ह्या बाहेरून किंवा परराज्यातून येणाऱ्या व्यक्तींना प्रवेश दिला जात होता. परंतु आता सध्याची स्थिती पाहता प्रवेश पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.
तथापि एखाद्या कुटुंबातील व्यक्तींचा मृत्यू झाला असेल किंवा एखादी व्यक्ती आजारी असेल तर जिल्ह्यात येण्यासाठी ई – पास बंधनकारक करण्यात आला आहे. येत्या १ जून ते १५ जून पर्यंत हा निर्णय लागू असणार आहे.
दरम्यान ज्या जिल्ह्याचा महाराष्ट्रात पॉझिटिव्हिटी दर १०% टक्के आहे. तिथे शिथिलता देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. त्याचबरोबर ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी दर २०% टक्के आहे. तिथे अगोदरचे निर्बंध कायम राहतील, असे सरकारने जाहीर केले आहे.
राज्य सरकारने प्रवासाबाबत ही काही निकष जारी केले आहे. सदर प्रवास एखाद्या अशा प्रशासकीय घटकासाठी किंवा घटकातून होत असेल जेथे २० टक्के पेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी दर आहे आणि ७५ टक्क्यांपेक्षा जास्त ऑक्सिजन बेड भरलेले आहे. तेथे प्रवास करण्यास परवानगी मिळणार नाही.
फक्त कुटुंबातील मृत्यू, वैद्यकीय कारण आणि अनावश्यक आणीबाणीच्या प्रसंगी सेवा देणाऱ्या व्यक्तींना परवानगी देण्यात येणार आहे. तसेच इतर ठिकाणाहून प्रवास करण्यासाठी १२ मे २०२१ रोजी जाहीर केलेल्या आदेशाप्रमाणे निर्बंध / परवानगीच्या अटी-शर्ती लागू राहतील. त्यात कोणतेही बदल करण्यात आलेले नाही.