पंतप्रधानांच्या ७० व्या वाढदिनी ७० वृक्ष लागवड
बांद्यात होणार वृक्षारोपण कार्यक्रम तर सातार्डा येथे होणार रक्तदान शिबिर…
भाजपयुवामोर्चा उपजिल्हाध्यक्ष जावेद खतीब यांची माहिती…
बांदा :
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १४ ते २० सप्टेंबर हा ‘सेवा सप्ताह’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर रोजी बांद्यात ७० ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम होणार आहे. तर २० सप्टेंबरला सातार्डा येथील माई सभागृहात सकाळी ९ वाजल्यापासून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आल्याची माहिती भाजपयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब यांनी बांदा येथील पत्रकार परिषदेत दिली.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त १४ ते २० सप्टेंबर या कालावधीत करण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमाची माहिती देण्यासाठी भाजपयुमो सावंतवाडी तालुका बांदा मंडल बैठक संपन्न झाली.यावेळी श्री.खतीब यांनी माहिती दिली.
यावेळी तालुका उपाध्यक्ष सिद्धेश कांबळी, विणेश गवस, सरचिटणीस मंगेश राठवड, तालुका उपाध्यक्ष संदीप बांदेकर, सचिव अजित कवठणकर,सागर प्रभू, शहर अध्यक्ष साई सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.
रक्तदान शिबिरासाठी आ.नितेश राणे यांच्या सहकार्यातून पडवे येथील हॉस्पिटलची वैद्यकीय व्यवस्था उपस्थित असणार असून माजी सभापती प्रमोद कामत,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत, राज्य परिषद सदस्य मंदार कल्याणकर, उपसभापती शीतल राऊळ, तालुकाध्यक्ष महेश धुरी आदींच्या यांच्या सहकार्याने हे रक्तदान शिबिर होणार असून यावेळी जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर, उन्नती धुरी, पंचायत समिती सभापती सौ.मानसी धुरी, पंचायत समिती सदस्य संदीप नेमळेकर, शमिका बागकर व सर्व जिल्हा परिषद सदस्य, प्रमुख पदाधिकारी, सरपंच उपस्थित राहणार असल्याचे जावेद खतीब यांनी सांगितले.
यावेळी कार्यकारिणी सदस्य साईनाथ धारगळकर, केतन वेंगुर्लेकर, जिल्हा सचिव संजय नाईक, प्रितेश आरोंदेकर, काशिनाथ केरकर, नितेश कवठणकर, प्रवीण गावडे आदी उपस्थित होते.