*माजी सभापती निलेश सामंत यांच्या सहकार्याने व पुढाकाराने टॅंकरने पाण्याचा पुरवठा*
वेंगुर्ला :
तौक्ते चक्रिवादळाचा फटका निवती – मेढा किनारपट्टीला बसून खारे पाणी गावातील जमीनीत शिरल्याने गावातील बहुतांशी विहिरी खाऱ्या पाण्याने बाधीत झाल्या. त्यामुळे ग्रामस्थांचे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. त्यातच गावातील एका युवकाचा कोवीड रिपोर्ट पाॅझेटीव्ह आढळून आल्याने खाजगी विहीर मालकाने पाणी देणे बंद केले. त्यामुळे ग्रामस्थांना पाच किलोमीटर वरुन पिण्याचे पाणी आणावे लागले . ज्यांच्याकडे वाहन होते ते कुटुंब पाणी आणत होते, परंतु ज्यांच्याकडे वाहन नव्हते त्यांचे पाण्यामुळे फार हाल झाले.
ही समस्या माजी सभापती निलेश सामंत यांनी खासदार नारायण राणे यांच्या निदर्शनास आणून दिली असता त्यांनी ताबडतोब टॅंकरची व्यवस्था केली, व निलेश सामंतनी तो टॅंकर पाण्याने भरून स्वतः निवती – मेढा येथे जाऊन पाण्याची समस्या सोडवली .
*जोपर्यंत निवती – मेढा वासीयांची पाण्याची पर्यायी व्यवस्था होत नाही तोपर्यंत भाजपा च्या वतीने पाण्याची व्यवस्था केली जाईल असे माजी सभापती निलेश सामंत यांनी ग्रामस्थांनाआश्वासीत केले .*
यावेळी युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रसाद पाटकर, कुशेवाडा उपसरपंच निलेश सामंत, म्हापण माजी सरपंच नाथा मडवळ, परुळे शक्ती केंद्र प्रमुख रुपेश राणे, अनु.जाती मोर्चा ता.अध्यक्ष गुरुप्रसाद चव्हाण, निवती-मेढा सरपंच भारती धुरी, बुथप्रमुख नागेश सारंग, हेमंत खवणेकर, कमलेश मेतर, जयराम सारंग, आपा सारंग, सचिन धुरी, विजय धुरी, प्रज्योत मेतर, रामु भगत इत्यादी सह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्याची सोय केल्याबद्दल खा.नारायणराव राणेसाहेबांचे आभार मानले.