सिंधुदुर्गनगरी
तिलारी धरण क्षेत्रात गेल्या 24 तासात 11.60 मि.मी. पाऊस झाला असून इतर सर्व धरण क्षेत्रातील पर्जन्यमान निरंक आहे. जिल्ह्यातील विविध धरणातील पाणीसाठा आज सकाळी 8 वाजता प्राप्त माहिती नुसार पुढीलप्रमाणे आहे.
जिल्ह्याताली मोठ्या, मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढील प्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. तिलारी आंतरराज्य प्रकल्पामध्ये 219.7300 द.ल.घ.मी पाणी साठा आहे. सध्या तिलारी प्रकल्प 49.12 टक्के भरलेला आहे.
मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर – 36.7800, अरुणा – 17.9470, कोर्ले- सातंडी – 21.6770. लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढील प्रमाणे – शिवडाव – 1.0692, नाधवडे – 1.9048, ओटाव – 1.7132, देंदोनवाडी – 0.2895, तरंदळे – 1.4720, आडेली – 0.00, आंबोली – 0.7940, चोरगेवाडी – 0.9810, हातेरी – 0.3400, माडखोल – 1.6900, निळेली – 0.4130, ओरोस बुद्रुक – 0.9030, सनमटेंब – 0.0010, तळेवाडी – डिगस – 0.0630, दाभाचीवाडी – 0.6130, पावशी – 1.3870, शिरवल – 0.7380, पुळास – 0.6850, वाफोली – 0.3920, कारीवडे – 0.3950, धामापूर – 0.7660, हरकूळ – 0.5070, ओसरगाव – 0.0020, ओझरम – 0.3910, पोईप – 0.00, शिरगाव – 0.2760, तिथवली – 0.4760, लोरे – 0.1680 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.