You are currently viewing वायंगणी समुद्र किनारी आढळला बेवारस सिलेंडर

वायंगणी समुद्र किनारी आढळला बेवारस सिलेंडर

वेंगुर्ले पोलिसांनी पंचनामा करून घेतला ताब्यात

वेंगुर्ले
वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी समुद्र किनारी 30 मे रोजी सायंकाळी बेवारस स्थितीत एक लाल रंगाचा सिलेंडर आढळून आला. याबाबत सागर रक्षक सुहास तोरस्कर यांनी वेंगुर्ले पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी किनार्‍यावर जाऊन पंचनामा करून तो सिलेंडर ताब्यात घेतला आहे.

रविवार दिनांक 30 मे रोजी सुहास तोरस्कर किनाऱ्यावर फेर फटका मारत असताना त्यांना एक लाल रंगाचा गंजलेला बेवारस सिलेंडर दिसून आला. हा लाल रंगाचा गोलाकार सिलेंडर आहे. त्यांची तोंडापासुन तळापर्यंतची उंची 16 इंच असुन त्याची गोलाई 31 इंच आहे. सिलेंडरच्या वरील बाजूस नॉप असुन त्यांची उंची सुमारे 2 इंच असुन त्या नॉपच्या मध्यभागी एक आडवे छोट्या आकाराचे तोंड आहे. सदर सिलेंडर हा गंजलेल्या स्थितीत असुन तो कामासाठी वापरण्यात आला असल्याची शक्यता आहे. सिलेंडर मध्ये गॅस असण्याची शक्यता आहे.

दरम्यान श्री. तोरसकर यांनी याबाबत माहिती देताच घटनास्थळी पोलिस पिळगावकर, अमर कांडर, परब यांनी भेट देवून खात्री केली. त्यानंतर दोन पंचा समक्ष सदर सिलेंडर जप्त करुन सुरक्षेच्या कारनास्थव पोलीस स्टेशनच्या इमारतीच्या बाहेर सुरक्षित आणून ठेवलेल्या बेवारस सिलेंडरची बॉब शोधक नाशक पथका कडून पडताळी होऊन पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
WhatsAppFacebookTwitterGmailShare

प्रतिक्रिया व्यक्त करा