कणकवली :
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वाढता कोरोनाचा प्रादूर्भाव पाहता भाजप आमदार प्रसाद लाड यांनी कणकवली विधानसभा मतदारसंघातील कणकवली देवगड व वैभववाडी नगरपंचायतीला प्रत्येकी 5 अशा प्रकारे 15 ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर अंत्योदय प्रतिष्टानच्या माध्यमातून विधान परिषद आम.प्रसाद लाड यांनी कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, देवगड नगराध्यक्षा प्रियांका साळसकर व वैभववाडी नगराध्यक्ष रोहन रावराणे यांच्याकडे सुपूर्त केली.
कणकवली न.प.च्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात आम.प्रसाद लाड यांच्या हस्ते हे कॉन्स्ट्रेटर देण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, देवगड नगराध्यक्षा प्रियांका साळसकर, वैभववाडी नगराध्यक्ष रोहन रावराणे,उपनगराध्यक्ष बंडू हर्णे,माजी जी.प.अध्यक्ष गोट्या सावंत,गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक अभि मुसळे, विराज भोसले,शिशिर परूळेकर,नगरसेविका मेघा गांगण,तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री,शहर अद्यक्ष अण्णा कोदे, महिला शहर अध्यक्षा प्राची कर्पे, महेश सावंत, बंडू गांगण,आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रसाद लाड म्हणाले, आम.नितेश राणे यांच्यावर आमचे जास्त प्रेम असल्यामुळे त्यांच्या विधानसभा मतदार संघाकडे आम्ही आपुलकीने पहात आहोत. नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सुचवल्याप्रमाणे तीन न.प.साठी प्रत्येकी 5 ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर आमच्या अंत्योदय प्रतिष्टानच्या माध्यमातून देत असून जर्मनमधून आणलेले हे कॉन्स्ट्रेटरच्या माध्यमातून एका वेळी दोन पेशन्टला ऑक्सिजन पुरवठा होणार आहे.दोन वर्षांची औरंटी याची आहे.संस्थेच्या माध्यमातून एकूण 300 कॉन्स्ट्रेटर खरेदी करण्यात आले असून आणखीन 15 कॉन्स्ट्रेटर न.प.ला दिले जातील त्याचप्रमाणे हा कॉन्स्ट्रेटर भाजपा जिल्हाद्यक्ष राजन तेली यांच्याकडे सुपूर्त केली आहेत.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील तीनही मतदार संघात आमच्या सर्वांच्या
आमदार फंडातून 35 खाटांचे ऑक्सिजनसह कोविड सेंटर उभे करण्यात येणार असून माजी खास.निलेश राणे यांच्या सोबत कुडाळ, मालवण, सावंतवाडी या विधानसभा मतदारसंघातील कोविड सेंटरची चर्चा सुरू आहे.भाजपच्या माध्यमातून ज्या प्रमाणे पडवे येथे आरपीसीआर मशीनसाठी निधी देण्यात आला.तशाच प्रकारचा निधी या कोविड सेन्टरसाठी देण्यात येणार सल्याचे ते म्हणाले. सिंधुदुर्गत आम.नितेश राणे, माजी खास निलेश राणे हे राणेंचे दोन पुत्र काम करत आहेत.आता त्याच्या जोडीला राणेंचा तिसरा पुत्र म्हणून आपण विधायक काम करणार असल्याचे आम.प्रसाद लाड म्हणाले.
यावेळी प्रस्तावना करताना समीर नलावडे म्हणाले, कणकवली न.प.च्या माध्यमातून 30 बेडचे कोविड सेंटर सुरू करण्यात आले असून हे सेंटर शासनाच्या मदतीवर अवलंबून नरहाता आम्ही चालवत आहोत.आता भगवती मंगल कार्यालय येथे 100 बेडचे कोविड सेंटर सुरू करणार असून या कोविड सेंटरसाठी आम.प्रसाद लाड यांच्या माध्यमातून होणारी मदत आम्हाला बळ देणारी आहे.विधायक कामामध्ये आम नितेश राणे यांनी पूर्ण सहकार्य केले असून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून मिळत असलेले सहकार्य कोरोना रुग्णाच्या सेवेसाठी महत्वपूर्ण ठरत असल्याचे समीर नलावडे यांनी सांगत भविष्यातही आवश्यकती मदत मिळेल असा विश्वास देत आभार व्यक्त केला.