अत्यावश्यक सेवेतील दुकानं सकाळी ७ ते दु. २ या वेळेत सुरू
सिंधुदुर्ग :
अत्यावश्यक सेवेतील दुकानं सकाळी ७ ते दु. २ या वेळेत सुरू ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. ७ ते ११ ही वेळ रद्द करत नवी नियमावली जाहीर केली. राष्ट्रवादी उद्योग व व्यापार सेलचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी १० ते ११ या वेळेत होणारी गर्दी आणि त्यामुळे होणारा कोरोना स्प्रेडबाबत राष्ट्रवादीचा नेत्यांशी चर्चा केली होती. दरम्यान, आज ही वेळ वाढवत असल्याच उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. यामुळे राष्ट्रवादी उद्योग व व्यापार सेलचे जिल्हाध्यक्ष तथा सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या मागणीला यश आले आहे.