You are currently viewing खासदार नारायण राणे यांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांचा सत्कार

खासदार नारायण राणे यांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांचा सत्कार

सावंतवाडी

केंद्रात भाजप सरकारला सात वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सावंतवाडी भाजप वतीने कोरोना योद्धांचा सत्कार करण्यात आला. सावंतवाडील काझी शहाबुद्दीन हॉलमध्ये रविवारी हा सत्कार सोहळा पार पडला.

माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या हस्ते सावंतवाडील डाॅ. शंतनू तेंडुलकर, डाॅ. अभिजीत चितारी, डाॅ. मुरली, डाॅ. साईनाथ पित्रे, डाॅ. राजेश नवांगुळ, डाॅ. संध्या विर्नोडकर यांच्यासह पालिकेच्या आरोग्य कर्मचारी वर्गाचा आणि सामाजिक कार्यकर्त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष संजू परब, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, शहराध्यक्ष अजय गोंदावळे, नगरसेवक आनंद नेवगी, मनोज नाईक, परिमल नाईक, उदय नाईक, संदिप कुडतरकर, राजू बेग, दिलीप भालेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा