You are currently viewing सांगेली गावचं प्रतिष्ठित व्यक्तिमत्व वसंत महादेव राऊळ कालवश

सांगेली गावचं प्रतिष्ठित व्यक्तिमत्व वसंत महादेव राऊळ कालवश

सांगेली गावचे जाणकार गावकार, टेंबकरवाडीचे एक प्रतिष्ठीत व्यक्तीमत्व श्री वसंत महादेव राऊळ यांचे वयाच्या 74 व्या वर्षी ओरोस येथे ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.

योग्य निर्णयक्षमता असणारे, निर्णयावर ठाम असणारे, प्रसंगाला तत्पर धावणारे, ज्यांना गावराटीबद्दल टिचून माहीती असणारे, सांगेली देवस्थान बद्दल बरीच माहिती असणारे, सर्वांचे मार्गदर्शक, नेहमी सत्याची बाजू घेणारे, आमच्या प्रत्येक संकटात साथ देणारे, प्रसंगी मानाचा वयाचा मुलाहिजा न ठेवता ह्या तुमचा चुकता अस निक्षून सांगणारे श्री वसंत महादेव राऊळ
यांचे निधन झाल्याने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे
त्यांच्या पश्चात दोन भाऊ, दोन मुले, चार मुली, दोन सुना, चार नातवंडे, पुतणे असा परिवार आहे. गिरीजानाथ त्यांच्या आत्म्याला चिरशांती देवो हीच प्रार्थना..

प्रतिक्रिया व्यक्त करा