*किल्ले रहिवाशांनी खा.विनायक राऊत,आ. वैभव नाईक यांचे मानले आभार*
मालवण :
सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे विद्युत पोल, वाहिन्या तुटून सिंधुदुर्ग किल्ल्यावरील रहिवाशांचा वीज पुरवठा खंडित झाला होता.विद्युत वाहिन्या समुद्रातुन जात असल्याने वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज वितरण कर्मचाऱ्यांना अनेक अडथळे येत होते. याबाबत खासदार विनायक राऊत, व आमदार वैभव नाईक यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्यांच्या पाठपुराव्यामुळे प्रकाशगड येथून आलेल्या वीज कर्मचाऱ्यांच्या टीमच्या सहाय्याने पडलेले पोल व विद्युत वाहिन्या पुन्हा बसवून सिंधुदुर्ग किल्ल्यावरील वीज पुरवठा काल पासून सुरळीत करण्यात आला आहे.त्यामुळे अनेक दिवसांनी किल्ले रहिवाशांच्या घरात विजेचा लखलखाट झाला आहे. अथक प्रयत्नांनी वीजपुरवठा सुरू करून दिल्याबद्दल किल्ले रहिवाशांनी खा.विनायक राऊत, आ. वैभव नाईक व विजवितरण कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.