बांदा
स्वानंद चॅरिटेबल ट्रस्ट पुणे आयोजित मी सावरकर या स्पर्धेअंतर्गत संगीतमय सावरकर या गायन स्पर्धेत सावंतवाडी तालुक्यातील नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे संगीत शिक्षक नितीन धामापूरकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.
या स्पर्धेत भारतासह अमेरिका,ऑस्ट्रेलिया, थायलंड, कतारसारख्या परदेशातील सहाशेपेक्षा अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत नितीन लक्ष्मीकांत धामापुरकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. ते नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नेमळे या ठिकाणी संगीत शिक्षक म्हणून कार्यरत असून ते संगीत विशारद आहेत. या स्पर्धेत त्यांना रुपये दहा हजाराचा धनादेश, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. त्यांनी सावरकर यांचे ने मजशी ने परत मातृभूमीला हे गीत सादर केले होते. या स्पर्धेचे परीक्षण पंडित शौनक अभिषेकी यांनी केले होते. या स्पर्धेसाठी त्यांना हार्मोनियमकरिता त्यांचे गुरूवर्य निलेश मेस्त्री तर निरज भोसले यांची तबला साथ लाभली. त्यांच्या या यशाबद्दल नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आ. भि. राऊळ , मुख्याध्यापक कल्पना बोवलेकर तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. नितीन धामापूरकर यांनी नेहमी विविध गायनाच्या स्पर्धात्मक उपक्रमात सहभागी होऊन सुयश मिळवत असून त्यांच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून कौतुक होत आहे