You are currently viewing महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पोलीस उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पोलीस उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या आजी-माजी लोकप्रतिनिधींची अश्लील व्हिडिओ क्लिपची चौकशी करून कारवाई करणे बाबत

तालुक्यातील एका गावात आजी-माजी लोकप्रतिनिधींची बातमी काही वृत्तपत्रांमध्ये छापून आली होती.सोशल मीडिया मध्ये सुद्धा या आजी-माजी लोकप्रतिनिधींची अश्लील क्लिप व्हायरल होत आहे.या प्रकरणाची चौकशी होणार का ?त्यांचे व्हिडिओ चित्रीकरणारे कोण आहेत?पहिल्यांदा सोशल मिडियात क्लिप टाकणारा कोण ? त्याचीही चौकशी होणार आहे का ? अश्याप्रकारच्या क्लिप काढून पॉर्न साईट वर टाकून पैसे कमावले जात आहेत का ? किती अश्लील क्लिप बनवले गेले आहेत? त्या महिलेवर याप्रकारचा कोणता दबाव होता का? असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत.
आज निवडणुकांमध्ये महिला लोकप्रतिनिधींना 50 टक्के आरक्षण आहे परंतु अशा प्रकारच्या व्हायरल होत असलेल्या क्लिपमुळे महिलांना घरातून पायबंद घातले जाण्याची शक्यता आहे.
सदर क्लिप मध्ये चुंबन दृश्य स्पष्टपणे दिसत आहे.सेंसोरबोर्ड सुद्धा अशा दृश्यांना कात्री लावते तसेच अशा प्रकारच्या या दृश्यांचा भाग असलेला मालिका तसेच सिनेमा यांना प्रौढांसाठी हे प्रमाणपत्र दिले जाते. सार्वजनिक ठिकाणी आजी-माजी लोकप्रतिंनिधींनी अशा प्रकारे वर्तन करणे,आपल्या अन्य सहकारी लोकांसोबत जाणीवपूर्वक मोबाईलवर चित्रीकरण करून घेणे,सोशल मिडियात फिरवणे अत्यंत निषेधार्ह आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही या घटनेचा निषेध करत आहोत.
सदर जोडप्याच्या या कृत्याबद्दल संबधित गावातील नागरिकांनी बहिष्कार घातल्याचे समजत आहे असे जरी असले तरी पोलिसांनी याप्रकरणी हस्तक्षेप करून सदर जोडप्याची कसून चौकशी करणे आवश्यक आहे.जमीन लुबाडून त्याचा व्यवहार करुन आलेल्या माजातुन असल्याची चर्चा गावात दबक्या आवाजात आहे.त्यामुळे अशी विकृती वेळीच ठेचली गेली पाहिजे.
सिंधुदुर्ग जिल्हा सुसंकृत लोकांचा जिल्हा असल्याने अशा प्रकारच्या गोष्टी जर घडत असतील तर वेळीच त्यावर वेळीच पायबंद घालणारे आवश्यक आहे.म्हणूनच आजी-माजी लोकप्रतिनिधींची चौकशी करावी, व्हिडिओ चित्रीकरण करणारे यांचीही चौकशी करावी,पॉर्न साईट क्लिप टाकून पैसे कमावले जात असेल तर त्या दृष्टीनेही तपास व्हावा, अशा प्रकारच्या अजुन किती अश्लील क्लिप बनवले गेले आहेत,त्या महिलेवर याप्रकारचा कोणता दबाव होता का? सोशल मीडिया वर पहिली क्लिप टाकणार्‍यावर सायबर सेल अंतर्गतही पोलिसांनी कारवाई करावी.यासाठी आम्ही हे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे देत आहोत. यावेळी उपस्थित
उपस्थिती ऍड अनिल केसरकर शहराध्यक्ष आशिष सुभेदार कार्याध्यक्ष संतोष भैरवकर उपशहर अध्यक्ष देवेंद्र कदम अनुप सोनी आदी उपस्थित

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 + 5 =