रिलायन्स फाउंडेशनच्या “मिशन अन्न सेवा ” व मिशन सुरक्षा उपक्रमाअंतर्गत धान्य किट व मास्क वाटप
कोरोनाच्या काळात अडचणीत आलेले गरीब, वयोवृद्ध निराधार, बेरोजगार, मोल मजुरी करणारे कामगार यांना रिलायन्स फाउंडेशन व पाटीदार युवा मंडळ सामाजीक संस्था कडून रेशन किट चे वाटप करण्यात आले.रिलायन्स फाउंडेशनच्या वतीने गरजू व्यक्तींना मदत व्हावी या हेतूने संपूर्ण देशभर मिशन अन्न सेवा हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात या उपक्रमासाठी पाटीदार युवा मंडळ मदत करत असून हि संस्था विविध सामाजिक कार्यमध्ये रत्नागिरी मध्ये अग्रेसर असून, ग्रामीण व शहरी भागातील १५० कुटुंबियांना मदत पोहचवण्यात आली आहे . त्याचप्रमाणे कोरोनाच्या संक्रमणापासून बचाव करण्यात महत्वाचा साधन म्हणजे मास्क चे वाटप फळ व पालेभाज्या विक्रेते याना करण्यात आले . सुमारे १००० रिलायन्स फाउंडेशनचे मास्क वाटप पाटीदार युवा मंडळाच्या मार्फत करण्यात आले. यासाठी रिलायन्स फौंडेशन चे महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री. दीपक केकानं , रिलायन्स फाउंडेशनचे रत्नागिरी जिल्हा व्यवस्थापक श्री. राजेश कांबळे व रत्नागिरी पाटीदार युवक मंडळ प्रमुख हितेंद्र पटेल उर्फ जितू पटेल, विजय पटेल ,भावेश पटेल , तसेच पाटीदार युवक मंडल सदस्य ,यांनी एमआयडीसी, नाचणे , खेडशी विभातील गरजवंत लोकांना वाटप केले . श्री. संतोष सावंत, माजी सरपंच नाचणे ग्रामपंचायत यांनी नाचणे परिसरात गरजूना रेशन किट वाटपात मोलाचं सहकार्य लाभले . जितू पटेल, सचिन सावंत, निलेश विलणकर यांचा रेशन किट वाटपात मोलाचं सहकार्य लाभले. सदर वाटप हे कोरोनचे सर्व नियम पाळून करण्यात आले.