*आ. वैभव नाईक यांनी रुग्णवाहिकेची मागणी केली पूर्ण*
मालवण :
आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतुन पेंडूर कट्टा ग्रामीण रुग्णालयासाठी नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आली असून या रुग्णवाहिकेचे लोकार्पण आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आले. कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर रुग्णांच्या सेवेसाठी पेंडूर कट्टा ग्रामीण रुग्णालयाला नवीन रुग्णवाहिका देण्याची मागणी करण्यात आली होती. आ. वैभव नाईक यांनी याची दखल घेऊन हि मागणी पूर्ण केली आहे. त्यामुळे रूग्णांना याचा लाभ होणार आहे.
याप्रसंगी आ. वैभव नाईक यांनी पेंडूर कट्टा ग्रामीण रुग्णालयाचा आढावा घेतला. कोविड रुग्ण तसेच औषध पुरवठा याबाबत माहिती जाणून घेतली. कोणत्याही गोष्टीची कमतरता भासल्यास तात्काळ संपर्क करण्याचे आवाहन केले. कोविड साखळी तोडण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पेंडूर मध्ये कोविड केअर सेंटर सुरू करण्याची निवेदनाद्वारे मागणी शिवसेना व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे केली आहे.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डान्टस, पंचायत समिती सदस्य कमलाकर गावडे, विनोद आळवे, वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नील बोदमवाड, अधिपरिचारिका राधिका राणे, औषध निर्माता रमाकांत आंगणे, बाबू टेंबुलकर, दर्शन म्हाडगूत, विष्णू लाड, बाबू कांबळी, पपी सावंत, दादा वायंगणकर, देवा रेवडेकर, श्वेता सावंत आदी उपस्थित होते.